• contact@thetelevox.com
Tuesday, March 28, 2023
The Televox
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • मनोरंजन
  • खेळ
  • राजकीय
  • टेक-तंत्र
  • लेख | लायब्ररी
  • व्यापार
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • मनोरंजन
  • खेळ
  • राजकीय
  • टेक-तंत्र
  • लेख | लायब्ररी
  • व्यापार
No Result
View All Result
The Televox
No Result
View All Result
Home राजकीय

चिंचवडची पोटनिवडणूक बेरोजगारी, महागाई अन् दादागिरीच्या विरोधात – Mahaenews

TheTelevox by TheTelevox
February 15, 2023
in राजकीय
0
The Televox
160
SHARES
176
VIEWS
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांची भाजपवर टीका

पिंपरीः चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही देशात निर्माण झालेल्या बेरोजगारी, महागाई आणि दादागिरीच्या मुद्यांवर लढविली जात आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्यांची लढाई आता आपल्या हाती घेतली असून भाजपच्या हुकुमशाही कारभारातून मुक्त व्हायचे असेल तर परिवर्तन झालेच पाहिजे. भाजपने आपल्या सत्ताकाळा केवळ भुलथापा मारून नागरिकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बदल घडविण्यासाठी सर्वांनी नाना काटे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे सौदागर येथे बुधवारी (दि. १५) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेख बोलत होते.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामटे, प्रदेश उपाध्यक्ष मयूर गायकवाड, विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस गौतम आगा, चिंचवडचे निरीक्षक महेश हांडे, प्रदेश सचिव डॉ. अरुण शिंदे, पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुळे तसेच पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना शेख म्हणाले की, आमचा विरोध भाजपच्या हुकूमशाही व लोकविरोधी कारभारा बद्दल आहे. देशात गेल्या ७० वर्षांत इतरांनी काहीच केले नाही, केवळ भाजपने विकास केल्याच्या भूलथापा मारल्या जात आहेत. सर्वांनी आता भाजपचा खोटारडेपणा ओळखला आहे. देशाचाच नव्हे तर पिंपरी-चिंचवड विकास केवळ आणि केवळ राष्ट्रवादीच्याच काळात झाला, हे सत्य सर्वांनीच मान्य केले आहे. हिंजवडीसारखी आयटीनगरी उभारण्याचे श्रेयही शरद पवार यांनाच जाते.

भाजपच्या काळात केवळ दादागिरी, भ्रष्टाचार आणि भूलथापा याच बाबी घडल्या आहेत. कोणताही विकासाचा अजेंडा न ठेवता केवळ जनतेमध्ये भ्रम पसरविणे हा एकमेव उद्योग या लोकांनी चालविला आहे. मात्र जनता हुशार आहे. त्यांना आता या बाबी समजल्या असल्यामुळे चिंचवडमध्ये यावेळी परिवर्तन घडणार आणि नाना काटे हे प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही शेख यांनी बोलून दाखविला. यानंतर राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. तसेच नाना काटे यांच्या विजयासाठी ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे सध्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असून त्यांची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. त्यामुळे भाजपाला त्यांचा पराजय डोळ्यांनी दिसत असून त्यांनी केलेल्या कामावर न बोलता ते फक्त सहानभूतीवर निवडणूक लढत आहेत. प्रत्येक ठिकाणी भावनिकतेच्या मुद्द्यावर मते मागत आहेत. मात्र चिंचवडच्या जनतेला विकास आणि भावनिक मुद्दे कळत असल्यामुळे यावेळचे मतदार हे भावनिकतेवर नव्हे विकासाच्या अजेंड्यावरच होणार असल्याचे रविकांत वर्पे म्हणाले.

यावेळी बोलताना युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, भाजपने महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळविले आहेत, त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मतदान मागावे. पुणे जिल्ह्यातील तळेगावसह इतर अनेक प्रकल्प गुजरातला दान करून महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करणाऱ्यांनी यापूर्वीही वेळोवेळी खोटी आश्वासने दिली. निवडणुकीनंतर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने भाजपचा कारभार सुरू आहे. त्यामुळे चिंचवडची निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असून असून या लढाईत नाना काटे हे पन्नास हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होतील, अशी खात्रीच शेख यांनी बोलून दाखविली.

ADVERTISEMENT
Previous Post

ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं ..! – Mahaenews

Next Post

‘देवेंद्र फडणवीस कधीही खोटं बोलत नाहीत’; गिरीश महाजन – Mahaenews

TheTelevox

TheTelevox

It is the 24 hour news website which gives information in Marathi languages Providing appropriate information to the readers is the main perspective.

Related Posts

On the occasion of Ram Navami, grand bike rally organized by BJP in Bhosari
राजकीय

रामनवमी निमित्ताने भोसरी येथे गुरुवारी भाजपाच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन – Mahaenews

March 28, 2023
168
राजकीय

‘समाजाला आवश्यक असणारे नवनवीन कार्यक्रम राबवायला हवेत’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील  – Mahaenews

March 28, 2023
168
The Televox
राजकीय

पवना सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून सुनील लांडगे यांची माघार! – Mahaenews

March 28, 2023
168
Anand Dave said that talk about Savarkar should be stopped or Gandhi's 100 sins will be brought to light
राजकीय

‘सावरकरांवर बोलणं थांबलं नाहीतर गांधींची १०० पापं समोर आणू’; आनंद दवेंचं वक्तव्य – Mahaenews

March 28, 2023
168
NCP criticizes state government over toll hike on Mumbai-Pune highway
राजकीय

मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वाढीवरून राष्ट्रवादीची राज्य सरकारवर सडकून टीका – Mahaenews

March 28, 2023
168
Navneet Rana is mentioned as Hindu Lioness on the banner
राजकीय

‘हिंदूत्व हाच श्वास..धर्म रक्षणाची आस…’; नवनीत राणांचे बॅनर्स चर्चेत! – Mahaenews

March 28, 2023
168
Next Post
Girish Mahajan said that Devendra Fadnavis never tells lies

‘देवेंद्र फडणवीस कधीही खोटं बोलत नाहीत’; गिरीश महाजन - Mahaenews

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The Televox InFacebook

The Televox inTwitter

ADVERTISEMENT

Most PopularIn The Televox

  • जि.प.कें.प्रा. कन्या शाळेच्या विकासासाठी लोकवर्गणी चा आधार :- किरण बिच्चेवार यांची खंत
    👉🏻मतदार संघातील आमदार- खासदारा सह लोकप्रतिनिधीचे शाळेकडे मात्र साफ दुर्लक्ष..!
  • हिमायतनगर शहरातील सर्व स्टेट लाईट सुरु करण्याची माजी नगरसेविका सातव यांची मागणी..
  • हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर..
    👉🏻 शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी सह अनेक मातब्बर निवडणुकीत रिंगणात उतरणार..!
  • अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी व्यक्त केली खंत! – Mahaenews
  • ‘राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’; नितेश राणे – Mahaenews

Most View Categories

  • Uncategorized
  • आरोग्य विभाग
  • खेळ
  • टेक-तंत्र
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नांदेड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
    • हिमायतनगर
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • लेख | लायब्ररी
  • विदेश
  • व्यापार
  • शैक्षणिक
The Televox

It is the 24 hour news website which gives information in Marathi languages Providing appropriate information to the readers is the main perspective.

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य विभाग
  • खेळ
  • टेक-तंत्र
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नांदेड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
    • हिमायतनगर
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • लेख | लायब्ररी
  • विदेश
  • व्यापार
  • शैक्षणिक

Recent Posts

  • रामनवमी निमित्ताने भोसरी येथे गुरुवारी भाजपाच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन – Mahaenews
  • ‘समाजाला आवश्यक असणारे नवनवीन कार्यक्रम राबवायला हवेत’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील  – Mahaenews
  • पवना सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून सुनील लांडगे यांची माघार! – Mahaenews
  • ‘सावरकरांवर बोलणं थांबलं नाहीतर गांधींची १०० पापं समोर आणू’; आनंद दवेंचं वक्तव्य – Mahaenews
  • मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वाढीवरून राष्ट्रवादीची राज्य सरकारवर सडकून टीका – Mahaenews
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2019-2022 TheTelevox - News & Media Managment by The Televox.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • विदेश
  • मनोरंजन
  • खेळ
  • राजकीय
  • टेक-तंत्र
  • लेख | लायब्ररी
  • व्यापार

© 2019-2022 TheTelevox - News & Media Managment by The Televox.